दिनांक ३०/०८/२०२१ रोजी अंमली पदार्थ विरोधी कक्ष, मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालय यांना गोपनीय माहितगारामार्फत खात्रिशिर बातमी मिळाली की, वालीव पोलीस स्टेशनच्या हद्दित शांतीनगर परिसरास एक इसम हा ब्राउन शुगर, चरस व गांजा या अंमली पदार्थाची बेकायदेशिररित्या विक्री करीत आहे. मिळालेली बातमी डॉ. श्री महेश पाटील, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) व श्री. रामचंद्र देशमुख, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली छापा कारवाई केली असता, कारवाई दरम्यान आरोपी अब्दुला अल्लीमुल्ला चौधरी रा. नवजीवन, शांतीनगर वालीव यास ताब्यात घेवून त्यांच्या जवळ असलेले १) १,००,०००/- रुपये किंमतीचे ३७ ग्रॅम वजनाची ब्राउन शुगर, २) ४,८०,००/- रुपये किंमतीचे १६० ग्रॅम वजनाचा चरस, ३) ८७,५००/- रूपये किंमतीचा ३ किलो ५८५ ग्रॅम वजनाचा गांजा व ४) सदर गुन्हयात वापरेली ३,२१,५००/- एवढी रोख रक्कम व मोबाईल फोन, वजन काटा असा एकुण ९,९१,०००/- रुपये किंमतीचा रोख रकमेसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाईबाबत वालीव पोलीस स्टेशन येथे अंमली पदार्थ विरोधी कायदयान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयाचा पुढिल तपास सपोनि. श्रीमती. कोळी हया करीत आहे.
सदरची कारवाई डॉ. श्री महेश पाटील, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) व श्री. रामचंद्र देशमुख, सहा. पोलीस आयुक्त, (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. श्री. देविदास हंडोरे, सपोनि. विलास कुटे, सपोनि. श्रीमती तेजश्री शिंदे, पोहवा. धनाजी इंगळे, पोशि. ज्ञानेश्वर चव्हाण, विष्णुदेव घरबुडे, अजय यादव व ईश्वर पाटील सर्व नेमणूक-अंमली पदार्थ विरोधी कक्ष, मिरा-भाईंदर,वसई-विरार यांनी केली आहे.
