वाकोला – ३६ लाखाचा ‘मेफेड्रॉन’ (एम.डी.) हा अंमलीपदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या जवळ बाळगणा-या परेदशी नागरीक असलेल्या महिलेस वाकोला पोलीस ठाणे यांनी केली अटक. अधिक माहितीनुसार पो.ह. तानाजी पाटील यांना गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली कि कलिना,सांताक्रुझ पूर्व, याठिकाणी अंमली पदार्थाची विक्री होण्याची शक्यता आहे . मिळालेल्या माहितीच्या आधारे दिनांक २७/०४/२०२२ रोजी दुपारच्या दरम्यान कक्ष-5 चे पोलीस पथकाने छापाकारवाई करून मालवण किणारा हॉटेलच्या समोरील मार्गावर, साईबाबा मंदिराजवळ, शिवनगर, कलीना, सांताक्रुझ पूर्व, या ठिकाणी एकुण 230 ग्रॅम वजनाचा ‘मेफेड्रॉन’ (एम.डी.) हा अंमली पदार्थ वाहतुक, विक्री व व्यापार करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या जवळ बेकायदेशिररित्या बाळगणा-या Zalwango Moureen @ Anita, वय २४ वर्ष या महिलेस पंचनाम्याअंतर्गत ताब्यात घेण्यात आले असून सदरबाबत वाकोला पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.
सदरची कारवाई प्रपोनि घनश्याम नायर, पो.नि.येरेकर, पो.नि.गोंधळी, स.पो.नि.अमोल माळी,स.पो.उ.नि.भुजबळ, पो.ह./राणे, पो.ह./विचारे,पो.ना./सिंग, पो.ना./पाटील, पो.ना./जाधव, तसेच महिला पो.ना./कार्कीडे, म.पो.शि./देषमुख, म.पो.शि ./पाटील आणि स.पो.उ.नि.चा. सांळुखे, पो.ह.चा./मालूसरे, पो.शि. पाटील यांनी केलेली आहे.
