भाईंदर : दिनांक ०९/०९/२०२१ रोजी मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी कक्ष यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती प्राप्त झाली की, भाईंदर (पुर्व), आरएनपी पार्क येथील डायमंड खुशाल बिल्डींग समोर एक ईसम त्याच्या राहत्या घरात गांजा नावाचा अंमली पदार्थ बाळगुन त्याची विक्री करतो.सदर मिळालेली बातमी श्री. रामचंद्र देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांना कळवुन डॉ. श्री. महेश पाटील पोलीस उप आयुक्त (गुन्हे) यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे छापा कारवाई करण्यात आली. सदर कारवाई दरम्यान आरोपी सिकंदर शब्बन खान वय ३५ वर्षे, रा.डायमंड खुशाल बिल्डींगचे समोरील झोपडीत, आरएनपी पार्क, एस.व्ही.रोड, भाईंदर (पुर्व) व मोहम्मद शहीद मोहम्मद मुख्तार शेख यांच्या जवळ एकुण ४ किलो २६ ग्रॅम वजनाचा व १,२०,६९०/-रु. किंमतीचा गांजा नावाचा अंमली पदार्थ मिळुन आला. सदर अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला असुन नमुद दोन्ही आरोपींविरुध्द अंमली पदार्थ कायदया प्रमाणे नवघर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास नवघर पोलीस पोलीस स्टेशन करित आहे.
सदरची कामगिरी डॉ. श्री. महेश पाटील, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. रामचंद्र देशमुख सहा.पोलीस आयुक्त, (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे पोलीस निरीक्षक श्री. देवीदास हंडोरे, सहा.पोलीस निरीक्षक विलास कुटे, मसपोनि. तेजश्री शिंदे नेम-भरोसा सेल, पोना. पवन पाटील, पो.शि. ईश्वर पाटील, पोशि. विष्णुदेव घरबुडे यांनी केली आहे.
