अंधेरी : दिनांक १३/०९/२०२१ रोजी पुरुष प्रवासी अंधेरी रेल्वे स्टेशन पश्चिमेकडील ब्रिज वरून उतरत असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या सॅक बागेतील चैन खोलून एकुण २०,००० /- रोख रक्कम व कागदपत्रे असलेले पाकीट चोरी करून पळून गेला अशी तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञात इसमाबद्दल अंधेरी रेल्वे पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेबाबत वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधीकारी पोलीस उपनिरीक्षक कांबळे, सपोफौ दळवी, पोहवा शेख, पोना रकक्षे, पोशि गाडे. यांनी CCTV फुटेज च्या आधारे तसेच गुप्तबतमीदाराच्या आधारे कौशल्यपूर्ण तांत्रिक बाबीचा वापर करून २४ तासाच्या आत आरोपी सरफुद्दीन समशू सय्यद, राहणार MA रोड फूटपाथ पूजा नगर झोपडपट्टी अंधेरी पश्चिम यास सापळा रचून पकडून त्याच्या कडून गुन्ह्यातील काळ्या रंगाचे पाकीट त्या मधील कागदपत्रे व एकुण १३,५०० /- रुपये हस्तगत करून त्यास अटक करण्यात आली आहे. सदरचा गुन्हा उघडकीस करण्यास अंधेरी रेल्वे पोलीस ठाणे यांना यश आले आहे.
