सप्टेंबर व ऑक्टोंबर २०२१ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) च्या दिनांक १६/०९/२०२१ ते दिनांक ११/१०/२०२१ या कालावधीमध्ये व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १० वी) च्या दिनांक २२/०९/२०२१ ते दिनांक ०८/१०/२०२१ या कालावधीमध्ये शैक्षणिक मंडळाकडून पुरवणी परीक्षा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. परीक्षेदरम्यान १०० मीटर परिसरात बेकायदेशीर जमाव जमवून गैरप्रकार करणे, परीक्षेत व्यत्यय आणणे त्याचप्रमाणे परीक्षार्थ्यांनी नक्कल करणे अशा स्वरूपाचे गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर अनुचित प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी श्री. विजयकांत सागर, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय), मिरा-भाईंदर, वसई-विरार आयुक्तालय यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ (सन १९७४ चा २) च्या कलम २१ नुसार परिक्षा केंद्राचे परिसरात परीक्षार्थी, पर्यवेक्षक, परीक्षा प्रक्रिया संबंधी अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस अंमलदार व पोलीस अधिकारी यांचे व्यतिरिक्त परीक्षा केंद्राच्या सभोवतालच्या १०० मीटर परिसरात बेकायदेशीर जमावास मज्जाव करण्यास तसेच झेरॉक्स सेंटर, फॅक्स सेंटर, टेलीफोन बूथ बंद ठेवण्याबाबत व मोबाईल फोन व स्मार्ट वॉच वापर करण्यास मनाई आदेश लागू केलेला आहे.
सदरचा आदेश हा मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालय अधिकार क्षेत्रातिल परिक्षा केंद्र परिसरात दिनांक १६/०९/२०२१ रोजी ०८.०० वा. पासून ते दिनांक ११/१०/२०२१ सायं. ०८.०० वाजे पर्यंत परीक्षेच्या दिवसापुरता लागू असणार आहे.
