तीन वर्षाच्या मुलाचे अपहरण करणारी किशोरवयीन मुलगी पोलिसांच्या ताब्यात.

Crime News

खार  :  खाररोड रेल्वे स्टेशनचे पुर्व बाजूस टर्मिनसकडे जाणाऱ्या ब्रीजच्या खाली मोकळया जागेत गुलमोहर धनराज वाघरी,वय ३० वर्षे, ह्या  स्वयंपाक करत असताना त्यांची लहान मुले १) दिपू, वय ०४ वर्षे, व २) राहुल, वय ०३ वर्षे असे सदर ब्रीजवर खेळायला गेले होते. जेवण झाल्यावर त्या व त्यांचे पती मुलांना  जेवण करण्यासाठी बोलवायला गेले असता, दिपू त्यांना सदरठिकाणी मिळून आला. परंतु राहुल हा त्यांना मिळून आला नाही. म्हणून त्यांनी आजूबाजूस शोध  घेतला परंतु तो मिळून आला नाही. त्यावर त्यांनी आपला मुलगा मिळत नसल्याची तक्रार नोंदविली  दिलेल्या तक्रारीवरून बांद्रा रेल्वे पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

मा.पोलीस उप आयुक्त, पश्चिम परिमंडळ डॉ.संदीप भाजीभाकरे व मा.सहाय्यक पोलीस आयुक्त, बांद्रा विभाग बाजीराव महाजन यांनी दिलेल्या सुचनांनुसार बांद्रा रेल्वे पोलीस ठाण्याचे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक एच.टी. कुंभार यांच्या  मार्गदर्शनाखाली पोनि.( गुन्हे ) शिवरामवार, सपोनि. अरण्ये, पोउपनि.भद्रशेट्टे व एकूण १६ पोलीस अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करून गुन्हयाचे घटनास्थळ व लगतच्या शहर परिसरात शोध मोहीम सुरु केली सदर पथकांनी खाररोड स्टेशनचे बाहेरील CCTV फुटेज तपासले असता एक महिला त्या मुलाला  घेवून जात असल्याचे दिसून आले. सदर महिलेचा खार पुर्व परिसरात व बांद्रा स्टेशनवरील वावर आढळून आला. त्यानंतर पुढे पाठपुरावा करून CCTV फुटेजच्या आधारे सदर महिला ही मुलासह कांदीवली पुर्व भागात गेल्याचे आढळले. दरम्यानच्या काळात सदर महिलेची बातमीदार यांच्या  मार्फत ओळख निष्पन्न केली. सदर महिलेचे नातेवाईक हे बोरीवली, दहिसर व भाईंदर या भागात असल्याचे समजून आले. बांद्रा रेल्वे पोलीस स्टेशनचे पथक हे मिळालेल्या माहितीनुसार कांदीवली पुर्व भागात तपास करत असताना, बोरीवली रेल्वे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कदम यांचे मार्गदर्शनाखाली त्यांचे पथक ही मा.वरिष्ठांच्या आदेशाने सदर शोध मोहिम राबवित असताना दिनांक १४/१२/२०२१ रोजी सदर गुन्हयात निष्पन्न झालेली किशोरवयीन मुलगी व गुन्हयातील अपहरण झालेला मुलगा  हा कांदीवली पुर्व भागात मिळून आला आहे. सदर पथकांनी त्यांना बांद्रा रेल्वे पोलीस स्टेशनला हजर केले असून मुलांस त्याच्या पालकांच्या ताब्यात सुखरूप देण्यात आले असुन मा.वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक रतिकांत भद्रशेट्टे हे करत आहेत.सदरची महिला ही फुटपाथला राहणारी असून फिरस्ती आहे. तसेच ती भीक मागून तिचा उदरनिर्वाह करत असल्याचे व तिला अपत्य नसल्याने लहान मुलगा सोबत असावा म्हणून ती सदर मुलास घेवून गेली असल्याचे पोलीस  तपासात प्रथमदर्शनी दिसून आले आहे.

सदरची यशस्वी कामगिरी मा. पोलीस आयुक्त, कैसर खालिद, मा.पोलीस उप आयुक्त, पश्चिम परिमंडळ, डॉ.संदीप भाजीभाकरे, मा.सहाय्यक पोलीस आयुक्त, बाजीराव महाजन व वरिष्ठ पोलीस निरीक्षक एच.टी.कुंभार व बोरीवली रेल्वे पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कदम यांचे मार्गदर्शनाखाली पोनि.( गुन्हे ) शिवरामवार,सपोनि. देविदास अरण्ये, पोउपनि, रतिकांत भद्रशेट्टे, पोहवा/विकास फडतरे, रविंद्र देवरे, पृथ्वीराज मोरे,सुरेंद्र मोरे, मपोहवा/गिरी, पटेल व पोना/शरद शेवाळे,प्रथमेश गायकवाड तसेच बोरीवली रेल्वे पोलीस ठाणे नेमणूकीतील सपोनि.दर्शन पाटील, पोहवा/शेख, पोशि/पाटील, सकट,चौधरी व मपोशि/पालवे यांनी पार पाडलेली आहे.मा.पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई व मा.पोलीस उप आयुक्त, पश्चिम परिमंडळ, लोहमार्ग मुंबई यांनी वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन केलेले असून त्यांना बक्षिसही जाहीर केले आहे.

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply