घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींना काशिमिरा पोलिसांनी अवघ्या पाच तासात ताब्यात घेऊन २,५०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
सदरची घटना दिनांक. २४/१२/२०२० रोजी स्टाईल राईट ऑफ टिकल प्रायव्हेट लिमिटेड काशिमिरा या कंपनीमध्ये अनोळखी इसमांनी कंपनीच्या गोडाऊनमध्ये भिंती वरुण आत मध्ये प्रवेश करून चष्मा बनविण्याची मशीन व प्रेस प्लेट्स असा एकूण २,५०,०००/- यांचा घरफोडी चोरी करून चोरून नेल्या बाबत काशिमिरा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ९९५/२०२० भादवि कलम ४५४, ३८०,३४ प्रमाणे दिनांक. २४/१२/२०२० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्ह्याच्या तपासासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरीक्षक धनंजय गायकवाड यांनी होण्याचा तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करून आरोपी १) वय-३६ वर्षे, राहायला आयटीआय जुनागाव वागळे इस्टेट ठाणे पश्चिम २) वय-१९ वर्षे, राहायला साईधाम चाळ डोंगरी झोपडपट्टी काशिमिरा दोघांना तब्बल पाच तासात ताब्यात घेऊन गुन्ह्यातील चोरीला गेलेला संपूर्ण माळ हस्तगत करण्यात आला.
सदरची कामगीरी श्री. विलास सानप, सहाय्यक पोलीस आयुक्त मिरारोड विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संजय हजारे, काशिमिरा पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धनंजय गायकवाड पोलीस ना./१५७४ विश्वनाथ जरग, पोलीस ना./३०६२ शिंदे यांनी केली आहे.
