३१/१२/२०२० रोजी ८:४० वाजता मौजे मिरा गाव येथील मानसी ऑर्केस्ट्रा बार अँड रेस्टॉरंट, मिरारोड काशिमीरा येथील बार चालक, मॅनेजर यांच्या प्रोत्साहनाने हे त्यांचे आर्थिक फायद्यासाठी बार मधील महिला वेटर यांना अर्धवट उघडे टाकून अश्लीश अंग विक्षेप करून ग्राहकांना आकर्षित करतात.
अशा मिळालेल्या बातमीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक. लोंडे पोलीस उप आयुक्त कार्यालय, परिमंडळ-१ व पथकाने मानसी ऑर्केस्ट्रा बार आणि रेस्टॉरंट मध्ये छापा टाकून ०५ महिला वेटर तोडके व तंगकपडे परिधान करून अंग अर्धवट उघडे टाकून “चोली के पीछे क्या है” या गाण्याच्या तालावर अंग विक्षेप करून ग्राहकांना आकर्षित करीत असताना व त्यांना बार मॅनेजर स्टुअर्ट व वेटर हे प्रोत्साहन देताना मिळून आले. म्हणून, मॅनेजर स्टुअर्ट व वेटर अशा २२ आरोपींच्या विरोधात काशिमिरा पोलीस ठाण्यात ०२/२०२१ कलम १८८,२९४,११४,१०९,२६९,२७०,४४ भा.द.वि. सहा महाराष्ट्र कोवीड-१९, उपाय योजना नियम २०२०चे नियम ११ सह आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ब साथ रोग अधिनियम २,३,४ अन्वये गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी श्री. अमित काळे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१ कार्यालयातील सहाय्यक पोलीस निरीक्षक. लोंडे व पथक यांनी केली.
